

Shaina NC Apologises
Esakal
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हातून हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अखेर शायना एनसी यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.