शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींना फाशी की जन्मठेप? आज होणार फैसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींना फाशी की जन्मठेप? आज होणार फैसला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणाने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. या क्रूर घटनेतील पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी तेंव्हा सर्वच स्तरातून उमटली होती. आज या सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबतचा अंतिम निकाल मुंबई हायकोर्टाकडून देण्यात येणार आहे. 2013 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. या घटनेतील क्रूरकर्मे विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अंसारी यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, या शिक्षेला या आरोपींनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हान देणाऱ्या याचिकेला हायकोर्टाने केराची टोपली दाखवली होती तसेच आरोपींची शिक्षा कायम करण्यासंबंधींचा निर्णय राखून ठेवला होता, तो आज सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे, या ओरोपींची फाशी कायम राहणार की, त्यांना जन्मठेप होणार, याबाबतचा निकाल आज हायकोर्टाकडून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: सरकारच्या घोषणेनंतरही राज्यभरात संप सुरुच; पडळकर काय म्हणाले?

काय आहे हे 'शक्ती मिल प्रकरण'?

मुंबईमधील महालक्ष्मी येथील शक्ती मिलच्या कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ रोजी ही घटना घडली होती. यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ही महिला छायाचित्रकार होती. ती आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती. मात्र, यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

हेही वाचा: सोनिया गांधींना का भेटला नाहीत? ममता म्हणाल्या,'प्रत्येकवेळी दिल्लीला...'

या घटनेची माहिती समोर येताच देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

loading image
go to top