Sharad Pawar Health : गौतम अदाणींनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Gautam Adani Visit : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.
Gautam Adani Meets Sharad Pawar in Mumbai Hospital

Gautam Adani Meets Sharad Pawar in Mumbai Hospital

esakal

Updated on: 

Gautam Adani Sharad Pawar Visit: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. या भेटीमुळे राजकीय आणि उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...