कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत पवारांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.  

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत पवारांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.  मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पाहावं लागेल, असंही ते म्हणालेत. 

कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत मला माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचंही पवार यांनी म्हटलं.  पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल, असं पवार पत्रकार परिषदेत बोललेत. 

अधिक वाचाः  कंगना राणावत मुंबईतल्या घरी दाखल, विमानतळावर आरपीआय-शिवसेना भिडली

प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलिस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार आहे. तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे, असंही ते म्हणालेत. 

हेही वाचाः  'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश

मला असं वाटतं अशी वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्यानं समाजात काय परिणाम होईल हे पाहावं लागेल. मात्र माझ्या मते अशी वक्तव्य करणाऱ्यांनी कोणी जास्त गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईतल्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. पोलिसांचं कतृत्त्व त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना केली तर त्या गोष्टीला गांभीर्यानं घेऊ नये, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

Sharad Pawar reaction action taken against Kangana office


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar reaction action taken against Kangana office