मुंबई : आदिवासी समाजाचा इतिहास हा संघर्षाचा आहे. देशाच्या जडणघडणीत योगदान असलेल्या आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्याबरोबरच त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात आदिवासींचे संघटन उभे करून त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आदिवासी मेळाव्यात केले.