उपकुलसचिवपदाची नियुक्तीच वादात असताना सोलापूर विद्यापीठाच्या झाल्या कुलसचिव

मुंबईने नाकारल्यानंतर सोलापुरात वर्णी; कुलसचिवपदाच्या नियुक्तीतील गैरप्रकार चव्हाट्यावर
She became  Chancellor of Solapur University when appointment of Vice Chancellor was dispute mumbai University
She became Chancellor of Solapur University when appointment of Vice Chancellor was dispute mumbai Universitysakal

मुंबई : मुंबई विद्यापीठाने कुलसचिवपदासाठी नाकारलेल्या आणि त्यापूर्वी उप-कुलसचिव म्हणून नियुक्तीसाठी असलेला अनुभव नसतानाही एक अधिकारी आता थेट सोलापूर विद्यापीठाचा कुलसचिव झाला आहे. यामुळे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाची अनागोंदी समोर आली आहे. शिक्षक पदाचा तात्पुरता आणि प्रभारी प्राचार्य पदाचा अनुभव हा उप-कुलसचिव पदासाठी ग्राह्य नसतानाही योगिनी घारे यांनी मुंबई विद्यापीठात उप-कुलसचिवपदी नियुक्ती मिळवली. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी दोन वेळा प्रयत्नही केले; मात्र विद्यापीठानेच कुलसचिवांच्या मुलाखतीसाठी अपात्र ठरवले असताना आता त्यांची सोलापूर विद्यापीठात कुलसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठ कायदाही धाब्यावर बसवण्यात आल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घारे या मुंबई विद्यापीठात उप-कुलसचिव होण्यापूर्वी त्यांच्याकडे शिक्षक पदावरील तात्पुरता आणि प्राचार्यपदाचा प्रभारी अनुभव होता. ३ जुलै २००४ च्या तरतुदीनुसार प्रभारी नेमणुकीचा कालावधी हा अनुभवासाठी ग्राह्य धरता येत नाही. शिवाय शिक्षकीय पदावरील अनुभव हा तात्पुरत्या स्वरूपाचा असताना त्यांचा प्रभारी प्राचार्य म्हणून असलेला सात वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात आला. तसेच उप-कुलसचिव या पदाच्या मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियुक्तीस मान्यता नव्हती, असेही गंभीर आक्षेप उच्च शिक्षण विभागाने अहवालात नोंदवले आहेत. तसेच घारे यांची उप-कुलसचिवपदी नियुक्ती करताना विद्यापीठाच्या जाहिरातीत अनुभवाबाबतचा उल्लेखच नसल्याची गंभीर बाबही अहवालात नोंदवली आहे.

नियुक्तीला मान्यता नव्हती
सन २००४ मध्ये योगिनी घारे यांच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयातील नियुक्तीस २१ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रानुसार मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली आहे. म्हणजेच तत्पूर्वी उप-कुलसचिव या पदाच्या मुलाखतीवेळी त्यांच्या नियुक्तीस मान्यता नव्हती. तसेच अनुभवाबाबत जाहीरातींमध्ये उल्लेख केलेला नसल्याचे आक्षेप उच्च शिक्षण विभागाने नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांचा हा अनुभव कुलसचिव पदासाठीदेखील ग्राह्य धरता येत नसताना त्यांना सोलापूर विद्यापीठात कुलसचिव म्हणून नियुक्ती देण्याबाबत प्राध्यापक, माजी सिनेट सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मी एकदा प्रयत्न केला हेाता. मुलाखतीपर्यंत मी पोहोचू शकले नव्हते; मात्र आता कुलसचिव म्हणून माझी नियुक्ती ही शासनाच्या प्रतिनिधींनी सर्व पात्रता लक्षात घेऊन केलेली आहे. माझे सर्व अनुभव, पात्रता आदी निकषात बसत असल्यानेच ही नियुक्ती झाली आहे. त्यात त्रुटी असती तर नियुक्तीच झाली नसती.
- योगिनी घारे, कुलसचिव, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ

निवड नियमानुसारच!
राज्य शासनाच्या ७ ऑक्टोबर २००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ३१ डिसेंबर २००८ च्या अधिसूचनेतील उप-कुलसचिवपदाच्या अर्हतेनुसार, योगिनी घारे यांचा अधिव्याख्याता पदाचा एकूण १५ वर्षे आणि प्रभारी प्राचार्यपदाचा ७ वर्षे १० महिने प्रशासकीय अनुभवाशी समकक्ष होता. त्यानंतरच त्यांची उपकुलसचिव पदासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com