
ठाणे : बच्चा विरुद्ध आजोबा अशी शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर आले आहेत. याला निमित्त ठरले ते माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केलेल्या दहशतवादावरील कारवाईचे विचारे यांच्या विधानावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून मध्यरात्री बॅनरबाजी करण्यात आली. याची कुणकुण लागताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे वादग्रस्त बॅनर फाडून यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांआधी ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेत वाद पेटण्याची शक्यता आहे.