Rajesh More : शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या व्हिडिओची चर्चा...

थेट ठाकरे गटाच्या शिवजयंती उत्सवानिम्मित उभारलेल्या स्टेज जाऊन महाराजांना केले अभिवादन..
Shinde Shiv Sena leader Rajesh More at thackeray group shiv jayanti event dombivli
Shinde Shiv Sena leader Rajesh More at thackeray group shiv jayanti event dombivli Sakal

डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जात असलेल्या मार्गात ठाकरे गटाकडून शिवजयंती निमित्त देखावा आणि स्टेज उभारण्यात आला होता.

यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सर्व मतभेद आणि राजकारण विसरत ठाकरे गटाकडून उभारण्यात आलेल्या स्टेजवर जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि तसेच उपस्थित कार्यकर्त्यांला हस्तांदोलन देखील केले. तर दरवेळी राजकारण नसते असा संदेश त्यांनी दिला. दरम्यान याचं व्हिडिओची आता चर्चा होऊ लागली आहॆ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com