कोट्यवधींच्या भूखंडावर डल्ला! भाजप नेत्याचा डाव शिंदेंच्या नगरसेवकाने उधळला, ५६९ कोटी बुडवल्याचा आरोप

Navi Mumbai: नवी मुंबईतील ५६९ कोटी रुपयांचा भूखंड स्वतःच्या घशात घालण्याचा डाव शिवसेनेच्या नगरसेवकांनी उधळून लावला आहे. ज्यामुळे भाजपच्या बड्या नेत्याने मारलेला डल्ला चव्हाट्यावर आला आहे.
CIDCO

CIDCO

Esakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईतील अतिशय मोक्याच्या आणि तितक्याच महागड्या वाशी सेक्टर १९-एफ येथील तब्बल ५६९ कोटी रुपयांच्या वेअरहाउसिंग भूखंडावर भाजपच्या एका बड्या नेत्याने मारलेला डल्ला चव्हाट्यावर आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) व्यापाऱ्यांच्या नावाने लाटलेला हा भूखंड स्वतःच्या घशात घालण्याचा डाव शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी उधळून लावला आहे. पाटकर यांनी या भूखंडावर 'आधुनिक मनोरुग्णालय' उभारण्याचा ठराव महासभेत मांडल्याने संबंधित नेत्याची झोप उडवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com