KDMC: 'महिला डॉक्टरवर हात उगारलेला नाही...' रुग्णालयातील मारहाणप्रकरणी शिंदेंच्या नेत्याचे स्पष्टीकरण, रुग्णाच्या आईचाही गंभीर आरोप

KDMC Hospital Doctors Beating: शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रेंनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
Shivsena corporator Ramesh Mhatre

Shivsena corporator Ramesh Mhatre

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी प्रथमच भूमिका मांडली आहे. आपण महिला डॉक्टरवर हात उगारलेला नसून सीसीटीव्हीतील दृश्य कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत असावे, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या आईने रुग्णालयात वेळेत उपचार व बेड उपलब्ध न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com