
Rajesh More says on sanjay raut
ESakal
डोंबिवली : आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते जिल्हाप्रमुख होते, बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केल्यानंतर मोठा वाद पेटला आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना थेट धमकी दिल्याचं पहायला मिळतंय. 'संजय राऊत यांना घरात घुसून मारू,' अशी जाहीर धमकी शिंदे गटाचे आमदार मोरे यांनी दिली आहे.