

पालघर : डहाणू तालुक्यातील तवा गारवा रिसॉर्ट येथे झालेल्या शिवसेनेच्या भव्य बैठकीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पेटली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून भगवा फडकणारच, असा एकमुखी ठराव शिवसैनिकांनी घेतला.