

Shiv Nadar donated Rs 2593 crore in one year
ESakal
मुंबई : 'एचसीएल'चे संस्थापक शिव नादर यांनी सलग पाचव्या वर्षी देशातील सर्वाधिक दानशूर व्यक्तीचा मान कायम राखला. नादर कुटुंबाने २०२५-२६ या आर्थिक वर्षांत रोज सरासरी ७.१ कोटी रुपये म्हणजे वर्षभरात २,५९३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 'एडलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२६' ही यादी जाहीर झाली आहे. या आर्थिक वर्षात २१९ दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे ११,५५४ कोटी रुपयांचे दान केले. गेल्या वर्षीच्या दहा हजार ३८० कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ ११ टक्के आहे. दानशूर व्यक्तींची संख्या १९२ वरून २१९ झाली आहे.