Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेचीही हजेरी

मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार
Shiv Sena attended Bharat Jodo Yatra of Congress rahul gandhi mumbai
Shiv Sena attended Bharat Jodo Yatra of Congress rahul gandhi mumbaisakal

मुंबई : राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाच भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडो यात्रा मुंबईतून जाणार नाही. मात्र या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता मुंबईतही काँग्रेसने भारत जोडो यात्रेचं आयोजन केले आहे. मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. भाजपा, आप आणि एमआयएम वगळता इतर जवळपास सर्व राजकीय पक्ष या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. शिवसेनेचीही हजेरी या भारत जोडो यात्रेसाठी असणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीसमवेत यात्रेत सहभागी करुन घेण्याबाबत अजूनही चर्चा सुरु आहे.

भारत जोडो यात्रेमध्ये कोणकोणते पक्ष सहभागी होणार ?

मुंबईत आयोजन करण्यात आलेल्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. शिवसेना पक्षाशी याबाबत चर्चा झाली असून शिवसेनेकडून मनिषा कायंदे या शिवसेनेच्या प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. दरम्यान भारत जोडो यात्रेला शिवसेनेने सहकार्य केल्यास दसरा मेळाव्याला काँग्रेस मदत करणार अशी काही एक्सचेंज ऑफर नाही. हे आंदोलन हे देशहितासाठी आहे आणि दसरा मेळावा हे शिवसेनचे बलस्थान आहे, असे उत्तर भाई जगताप यांनी दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, रिपब्लिकन पक्ष गवई गट, शेकाप पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डमध्ये आणि संपूर्ण भारतात चार महिन्यात भारत जोडो, नफरत छोडो मोहीम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत जोडो यात्रा निघणार असून विविध ठिकाणी फिरून यात्रा मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ संपणार आहे. मुंबईतील ही यात्रा एका दिवसाची असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com