उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिली 'स्माईल'; सस्पेंन्स कायम

shiv sena mla insist uddhav thackeray for cm position in party meeting
shiv sena mla insist uddhav thackeray for cm position in party meeting

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्या असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. पण, शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

उद्धव ठाकरेंनी दिली फक्त स्माईल 
आज, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. आमदारांच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. या मागणीनंतर उद्धव यांनी केवळ स्मित हास्य केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव पुढे करणार याची उत्सुकता लागली आहे. 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
या बैठकी संदर्भात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत आमदरांना मुंबईतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सगळ्या चर्चा झाल्यानंतरच सारं काही स्पष्ट होईल.' मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी नकार दिला तर, तुमचे नाव चर्चेत आहे. यावर शिंदे म्हणाले, 'मी एक शिवसैनिक आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे जे सांगतील तो निर्णय माझ्यासाठी शिवसैनिक म्हणून महत्त्वाचा आहे.' दरम्यान, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात शिवसेना आमदार मुंबईत द ललित हॉटेलमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदारांना जयपूरला हालवणार असल्याची माहिती मिळत होती. पण, आमदारांना जयूपरला हालवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. 

आणखी बातम्या वाचा

बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो नाही
  • आम्हाला एनडीएतून बाहेर काढण्यात आले
  • राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा, भाजपमुळेच
  • एनडीएतून बाहेर काढण्यापूर्वी शिवसेनेला विचारायला हवे होते
  • आपला निर्णय झालाय, शिवसेना सत्ता स्थापन करेल
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com