
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गेम खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्र्यांच्या कारनाम्यांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जातेय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांना रमी खेळताना दिसल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारचा आता कोठा झालाय आणि या कोठ्याची हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवतेय.