esakal | बहुमताची गोळाबेरीज संजय राऊतच करणार; रात्रीच दिल्लीला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena spokesperson sanjay raut to meet sonia gandhi in delhi

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवूनच शिवसेनेला सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यात काँग्रेससोबतची बोलणी करण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर असणार आहे.

बहुमताची गोळाबेरीज संजय राऊतच करणार; रात्रीच दिल्लीला जाणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळालाय. आता बहुमताचा 145चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला जिवाचं रान करावं लागणार आहे. यात मोठी जबाबदारी प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर आहे.

मी पुन्हा येणार नाही, फडणवीस सरकारची घोषणा

तरच, शिवसेनेला पाठिंबा; राष्ट्रवादीची भूमिका

काय घडले काय घडणार?
शिवसेनेला उद्या (ता. 11 नोव्हेंबर) सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याचे सांगण्यात आले आहे. भाजपने पुन्हा सत्तेत येणार नाही अशी भूमिका घेतली असल्यामुळे शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज आहे. संजय राऊत आज रात्रीच दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसकडे सध्या 44 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवूनच शिवसेनेला सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यात काँग्रेससोबतची बोलणी करण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर असणार आहे. तत्पूर्वी, राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी मुदत वाढवून मागणार असल्याची माहिती आहे. भाजपला 48 तासांची तर, शिवसेनेला 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघे एकाच कार मधून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये कारमध्येच सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. 

विरोधकांना हिणवणारे भाजप नेतेच विरोधी बाकांवर

फक्त संजय राऊत 
गेल्या 15 दिवसांत संजय राऊत यांच्याकडेच शिवसेनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती. त्यांनी 15 दिवसांत भाजपला अक्षरशः सोळो की पळो करून सोडले. आता सत्ता स्थापनेतही संजय राऊत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच राऊत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सतत संपर्कात होते. अनेकदा त्यांनी दिवसातून तीन-तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. शिवसेनेतून मीडियाशी बोलण्याचा अधिकार फक्त संजय राऊत यांनाच देण्यात आला होता.