मी पुन्हा येणार नाही; फडणवीस सरकारची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

मी परत येईन’ अशी घोषणा देत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी प्रांजळ कबूली राज्यपालांकडे केली.
 

मुंबई : मी परत येईन’ अशी घोषणा देत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी प्रांजळ कबूली राज्यपालांकडे केली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेसोबतची चर्चा असफल झाल्यानंतर अल्पमतातील सरकार स्थापन करू नये यावर भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय झाला. वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी सकाळी ही बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पुन्हा कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत दिल्लीवरून व्हिडीओ काॅन्फरन्सिंग द्वारे मार्गदर्शन केले.

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

बहुमताचे सर्व पर्याय फोल ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा नाद सोडून विरोधात बसावे यावर या बैठकीत एकमत झाले. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार हे सर्व नेते राजभवन वर गेले. राज्यपालांना त्यांनी सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे पत्र दिले. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपने ते विनम्रपणे नाकारले. 

'शिवमहाआघाडी'च्या हालचाली सुरू; शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

भाजपचे चाणक्य महाराष्ट्रात फेल 

भाजप सरकार स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले की,’ विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिले. पण शिवसेनेला भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा नाही. शिवसेनेला काॅंग्रेस, राष्ट्रवादी व काॅग्रेस सोबत सत्ता स्थापन करायची असून त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. यापेक्षा अधिक बोलण्याचे पाटील यांनी टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will not form govt in Maharashtra says BJP