

KDMC Dangerous Building
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या अतिधोकादायक इमारतींच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे पक्षाने प्रशासनाला धारेवर धरत तातडीने विशेष पुनर्विकास धोरण लागू करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असून दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली आहे.