

Vasai Virar Traffic
ESakal
वसई : वसई-विरार शहरात अनेक मार्गांची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडी, अपघात, प्रवास करताना खड्ड्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत चीड, संताप व्यक्त करणारे बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वसईच्या मार्गावर लावले असून, नागरिकांचे लक्ष वेधले आहे. आंदोलन किंवा महापालिकेला धडक देण्याऐवजी नवी युक्ती ठाकरे गटाने आजमावली असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.