esakal | विकासकामांवरून शिवसेनेचा मनसेला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

विकासकामांवरून शिवसेनेचा मनसेला टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) विकासकामांचा शहरात धडाका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी लावला आहे. शहरात विकासकामे कोण करतंय हे लोकांनाच माहीत आहे, असा टोला शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.

कल्याण येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित ठाकरे हे कल्याण डोंबिवली, टिटवाळा शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्यांवर सत्ताधारी शिवसेनेवर टिका केली होती.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेत रोज ५ लाखांपर्यंत नवीन रुग्ण सापडू शकतात; आरोग्य सचिव

शिवसेनेचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे सध्या संघटनात्मक पदाधिकारी मुलाखती आणि भेटीगाठीसाठी शनिवारी कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यावर सरदेसाई यांनी निशाणा साधला.

loading image
go to top