esakal | मुंबई शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही | Dasara Melava
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava
मुंबई शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही

मुंबई शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे. यंदाचा दसरा मेळावा माटूंगा येथील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थीतीत होणार आहे. पुढल्या वर्षाच्या सुरवातीलाच राज्यातील मुंबईसह अनेक महत्वाच्या महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पाश्‍र्वभुमीवर हा मेळावा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता.मात्र,कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर अद्याप जाहीर मेळावे, सोहळे घेण्यास परवानगी नसल्याने यंदाही दसरा मेळावा बंधिस्त सभागृहात होणार आहे. ‘दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे आज खासदार संजय राऊत यांनी सांगितले. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता 2 हजार 763 व्यक्तींची आहे. मात्र,निम्या उपस्थीतीत मेळावा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दुसऱ्या लाटेनंतरची रूग्णांची निच्चांकी नोंद

काही अपवाद वगळता कोविड पुर्व काळात शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच झाला होता. मात्र, गेल्या वर्षी कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर शिवाजी पार्क समोरील स्वातंत्रयवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोजक्या उपस्थीतीत दसरा मेळावा पार पडला होता. तर, यंदा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे. शिवसेनेचे सर्व नेते ,उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

कोविडची दुसरी लाट ओसरू लागल्यावर निर्बंधतात बऱ्याचा प्रमाणात शिथीलता आणण्यात आली आहे. मात्र, अद्याप जाहीर मेळाव्यां सारख्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्या पासून मुंबई, ठाण्यासह अनेक महानगर पालिकांच्या निवडणुका सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पाश्‍र्वभुमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी हा दसरा मेळावा महत्वाचा आहे.

loading image
go to top