

BMC Clears Rally Dates At Shivaji Park
Esakal
BMC Election News: महापालिका निवडणुकीची जवळ येत आहे, तसा प्रचारही जोर धरत आहे. मुंबईच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार, ११ जानेवारीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार असून, दुसऱ्या दिवशी १२ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.