शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरण! वैद्यकीय अधीक्षकही चौकशी समितीच्या रडारवर 

शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरण! वैद्यकीय अधीक्षकही चौकशी समितीच्या रडारवर 


मुंबई : शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात कोव्हिड विभागातील शौचालयात बेवारस मृतदेह आढळून आल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिकेकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या चौकशी सत्रातून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदेही सुटलेले नाहीत. त्यांचीही चौकशी करण्यात आली. डॉ. ललितकुमार आनंदे म्हणाले, की चौकशी अद्याप सुरू आहे. सर्वांची चौकशी होणार आहे. त्यानुसार माझीही झाली. सर्वांची जबानी नोंदवली जाणार आहे. चौकशी सत्र मोठी प्रक्रिया आहे. आधी तोंडी आणि नंतर लिखित स्वरूपात ती घेतली जाते. 

18 ऑक्‍टोबर रोजी शिवडी क्षयरोग रुग्णालयातील शौचालयात मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. मृतदेह कुजलेला अवस्थेत सापडल्याने तो बारा दिवसांपासून तिथे पडून असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्याबाबत रफी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. संबंधित मृतदेह सूर्यभान यादव (27) याचा असून तो क्षयरोगाच्या उपचारासाठी 30 स्पटेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, त्याला कोरोनाची बाधा झाल्याने पहिल्या माळ्यावरील कोव्हिड विभागात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, 4 ऑक्‍टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याबाबत आम्ही मिसिंग रिपोर्ट दाखल केला होता, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, मुंबई पालिकेकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. सध्या चौकशी सुरू आहे.  

Shivdi Hospital corpse case The medical superintendent is also on the radar of the inquiry committee

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com