लुवियानाविरोधात महेश भट न्यायालयात; एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल 

सुनिता महामुणकर
Monday, 26 October 2020

निर्माता मुकेश भट आणि त्यांचे भाऊ दिग्दर्शक महेश भट यांनी अभिनेत्री लुवियाना लोध हिच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

मुंबई : निर्माता मुकेश भट आणि त्यांचे भाऊ दिग्दर्शक महेश भट यांनी अभिनेत्री लुवियाना लोध हिच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात

लुवियाना भट परिवाराविरोधात आधारहीन, असत्य आणि बदनामीकारक जाहीर विधाने करीत आहे, असा आरोप भट यांनी केला आहे. यावर आज न्या. ए. के. मेनन यांच्यापुढे तातडीची सुनावणी झाली. न्यायालयाने लुवियानाला याबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकादारांविरोधात कोणतेही जाहीर विधान करणार नाही, अशी हमी न्यायालयाला लुवियानाच्या वतीने देण्यात आली. याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. 

नवीन जागेची थकीत वीजबिल वसुली विद्यमान मालकाकडूनच; ग्राहक न्यायालयाचा याचिकेवर निर्णय

लुवियानाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये तिचा नवरा सुमित सबरवाल हा ड्रग आणि मानवी तस्करींचे रॅकेट चालवितो आणि महेश भट यांचा हा व्यवसाय आहे, असा दावा या व्हिडीओमध्ये केला आहे. सुमित हा भट यांचा पुतण्या आहे, असेही यामध्ये सांगितले आहे; मात्र या दाव्याचे खंडन भट यांनी केले आहे. सुमित हा आमच्या नात्यात नसून आमच्या बहिणीच्या नवऱ्याचा भाऊ आहे आणि या प्रकरणात आमचा संबंध नाही, असे भट यांनी म्हटले आहे.

खासगी शाळांच्या शुल्काबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही; शिक्षण संस्थांची न्यायालयात याचिका

धांदात खोटे आरोप करणारा हा व्हिडीओ तिने डिलीट करावा, यापुढे भट यांच्याविरोधात विधाने करू नये, अशी मागणी याचिकेत केली आहे. सेलिब्रिटी असल्याने लुवियाना तिच्या पतीबरोबरच्या वादात आम्हाला गोवत आहे; मात्र आमचा काही संबंध नसून नाहक आमची बदनामी होत आहे, असा आरोप करून एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Bhatt in court against Louviana Filed a defamation suit of Rs one crore

टॉपिकस