मुंबई - सध्या मुंबईत तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले असून, उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी एसी सुविधा असलेल्या ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बसकडे वळत आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांतील एसटी आगारांतून सुटणाऱ्या एसी बसचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसत आहे.