रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रम स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

महाड : रायगड किल्ल्यावर गेल्या 125 वर्षांपासून तिथीप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. यानिमित्त रायगड किल्ल्यावर हजारोंच्या संख्येने शिवभक्‍त छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा मंडळाच्यावतीने कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, शिवभक्तांनी शिवपुण्यतिथी घरीच साजरी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी केले आहे. 

महाड : रायगड किल्ल्यावर गेल्या 125 वर्षांपासून तिथीप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. यानिमित्त रायगड किल्ल्यावर हजारोंच्या संख्येने शिवभक्‍त छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा मंडळाच्यावतीने गुरुवारी (ता.१२) हाेणारा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, शिवभक्तांनी शिवपुण्यतिथी घरीच साजरी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी केले आहे.

महत्‍वाची बातमी : चित्रपटगृहांमध्‍येही सोशल डिस्‍टन्‍सिंग 

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अभिवादन कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे आंग्रे यांनी सांगितले. शिवपुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर जाता येणे शक्‍य नसल्याने शिवभक्तांनी घरामध्ये योग्य अंतर ठेऊन शिवरायांच्या स्मृतीला वंदन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : बाळाच्‍या दुधासाठी बापाची उसनवारी 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करावे. त्यांचे स्मरण करावे, शिववंदन करून त्यांना अभिवादन करावे. त्या दिवशी शिवचरित्रातील विविध पैलूंवर कुटुंबामध्ये चर्चा करावी, ज्या घरामध्ये लहान मुले असतील, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगण्यात याव्यात, अशाप्रकारे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा शिवभक्‍तांनी अभ्यास करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivpunithati program at Raigad postponed