

Mumbai Protest At shivsena Bhavan
ESakal
मुंबई : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलनाचा भडका उडाला आहे. सीजेपीच्या समर्थानार्थ युवासेनेकडून मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलानाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नसल्यामुळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. यावेळी शिवसैनिकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. मात्र या दोघांचीही गाडी पोलिसांनी अडवल्यामुळे सेनाभवनासमोर मोठा राडा झाल्याचे दिसून येत आहे.