Eknath Shinde Dasara Melava: महागद्दार, 50 कोटी आणि निर्लज्ज; शिंदेंच्या भाषणातील सर्व मुद्दे वाचा एका क्लिकवर

eknath shinde dasara melava
eknath shinde dasara melava

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. यावेळी त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहुया...

• आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले.

• आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील

• आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे.

• आज आझाद मैदानावर हा आझाद असा मेळावा होतोय.

• आझाद मैदानाला देखील इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.

• पहाटेपासून लोक आले आहेत.

• इतर समाजाचा आपण सन्मान करतोय त्यांचाही आदर करतोय त्याचा सन्मान करत आपण पुढे जातोय अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसला आहे.

• शिवसैनिक म्हणून साबीर शेख बाळासाहेब यांच्या काळात मंत्री होते हे आमचे हिंदुत्व आहे ही आमची शिवसेना आहे

• सत्तेसाठी कधीही खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही करणार नाही आणि म्हणून आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो.

• आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही.

• निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले.

• त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता.

• तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे.

eknath shinde dasara melava
Dasara Melava: आमदार अपात्रतेचा निकाल 50 वर्षांनी लावा, पण...; उद्धव ठाकरेंनी केलं सरकारला आव्हान

• त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.

• पवारांकडे दोन माणसं पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा 2004 सालापासून त्यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता.

• त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले.

• त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातलं पाणी पण हलू दिलं नाही.

• शेवटपर्यंत त्यांनी समजू दिलं नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं.

• उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले.

• बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे.

• या राज्यात सुख शांती असली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी बीकेसीला मेळावा घेतला.

• काही म्हणाले तुम्ही शिवाजी पार्क सोडायला नको होता.

• इथे बाळासाहेबांचे विचार बिनधास्तपणे मांडता येतात. तेच आपले शिवतीर्थ

• बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती कधीच दिलीय.

• बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, बेइमानी तुम्ही केली.

• काँग्रेस, समाजवादी, एमआयएम, कुणाला डोक्यावर, कुणाला खांद्यावर घेतील काही सांगता येत नाही.

• हे कमी पडलं तर इस्राइल-हमासची संघटना आहे, त्यांची गळाभेट घेतील. हिज्बुल, लश्कर ए तोयबा यांची भेट घेतील लाचारीसाठी.

• शिवसैनिक मेला काय जगला काय यांना काहीच घेणं-देणं नाही.

• मी आणि माझं कुटुंब, रुईकर यांच्यासाठी चालत निघाले होते तिरुपतीला...

• त्याचा मृत्यू झाला.सुमंत रुईकर या शिवसैनिकाच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिले. यांना काही देणंघेणं नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत.

• खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही.

• म्हणून अब्दुल सत्तार आमच्यासमवेत आहेत.

• रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय.

• त्यांची बांधिलकी पैशाशी आहे. विचारांशी नाही. निर्लज्जपणाचे कळस गाठले.

• आपल्याला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष दिल्यानंतर बँकेकडे शिवसेनेचे पैसे मागितले.

• एकनाथ शिंदेंनी क्षणाचा विलंब न लावता ते द्यायला सांगितले.

• यांचे प्रेम फक्त पैशांवर आहे. बाळासाहेबांवर नाही.

• खोके त्यांना पुरत नाहीत. यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो.

• फक्त बोलत नाही. योग्य वेळेला बोलेल.

• गद्दार, महागद्दार....खरे खोकेबाज कोण...खरे महागद्दार कोण..यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, मतदारांशी गद्दारी केली...

• .यांनी गद्दारी केली.

• शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून आणण्याचा प्रयत्न केला.

• त्या वाघनखांवर संशय व्यक्त केला.

• शिवाजी महाराजांच्या शौर्यावर, अशा औलादी संशय घेऊ लागल्या.

• त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडलाय. आणि अफजलखानाचा आदर्श स्वीकारलाय.

• तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती.

• बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यांनी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा.

• एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.

• हिंमत करून, सरकार आडवं करून मी तिकडून इकडे बसलोय.

• तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे.

• तमाम जनता माझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पदाची कसलीही लालसा नाही.

• मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणी देखील करतोय.

• जसे मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे तसे तुम्हाला मी दिसतोय का?

• गहान टाकलेली शिवसेने सोडवण्याचे काम मी केले. मी गुन्हा केलाय का? असे शिंदे म्हणाले.

• मी मुख्यमंत्री झाल्यापासून सरकार पडणार पडणार म्हणत होते. मात्र, आमचे सरकार मजबूत आहे.

• कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, आमच्याकडे 210 आमदार आहेत. जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला पदाची अपेक्षा नाही

• कोरोनाच्या काळात तुम्ही घरे पैसे मोजत होता.

• खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सीजनमध्ये पैसे खाल्ले, कुठे फेडाले हे पाप.

• तुम्हाला जनता माफ करणार नाही.

eknath shinde dasara melava
Uddhav Thackeray Dasara Melava: शिंदे गट, भाजप ते राहुल नार्वेकर; उद्धव ठाकरेंचे शब्दाचे बाण! १० महत्वाचे मुद्दे...

• मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचं पांढर करत होतात.

• चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही

• तुम्ही सगळे बंद केले.

• कोरोनाच्या काळात तुम्ही घरे पैसे मोजत होता.

• खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सीजनमध्ये पैसे खाल्ले, कुठे फेडाले हे पाप.

• तुम्हाला जनता माफ करणार नाही.

• मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचं पांढर करत होतात.

• 2005 च्या पुरात बाळासाहेंबांना एकटे सोडून तुम्ही गेलात.

• तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकत नाही.

• शिवसैनिक जगला काय आणि मेला काय याचे यांना काहीही पडले नाही.

• आज आपण एकीकडे बाळासाहेबांचे विचार पाहतोय आणि दुसरीकडे सत्तेसाठी लाचारी पाहतोय.

• बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शिवतीर्थ आहे.

• मागच्या वेळी देखील मी शिवतीर्थावर मी दसरा मेळावा करु शकलो असतो, पण शांतता राहावी हा माझा उद्देश आहे.

• ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याच शेजारी तुम्ही जाऊन बसले आहेत.

• बाळासाहेब म्हणाले होते, ज्यावेळी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्यावेळी मी माझे दुकान बंद करेन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com