डोंबिवली : फुटबॉलच्या मैदानात सेनेची भाजपला किक

Shivsena varun sardesai
Shivsena varun sardesaisakal media

डोंबिवली : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मध्ये शिवसेना भाजपमध्ये (Shivsena-bjp) विकास कामावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर आरोप करण्याचे भाजपचे सत्र सुरूच असून अखेर शिवसेनेचे युवासेना नेते वरूण सरदेसाई (Varun sardesai) , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr shrikant Shinde) , यांनी फुटबॉलच्या मैदानावर भाजपला किक लगावली आहे. आपल्या बातम्या मीडियाने कव्हर कराव्यात म्हणून शिवसेना नेत्यांवर टीका केली जात आहे. त्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नसल्याची किक युवानेते वरुण यांनी मारली.

Shivsena varun sardesai
मुंबई : रेल्वेगाड्यांच्या डब्यांची तपासणी; धूम्रपान करणाऱ्या १६० जणांवर कारवाई

तर विरोधकांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या, मी आपल्या कामामधून जे बोलतोय ते लोकांर्पयत पोहच आहे अशी दुसरी किक खासदार डॉ. शिंदे यांनी मारली. सेना भाजपचे हे आरोप प्रत्यारोपचे सत्र आणखी किती लांबते हे पहावे लागेल. कल्याणध्ये शिवसेना युवासेना सहसचिव योगेश निमसे यांच्यावतीने कल्याण पश्चिमेत राज्यस्तरीय फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी युवा सेनानेते वरुण सरदेसाई, तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे, महेश गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवलीत भाजप आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका आहे? असा सवाल उपस्थित केला होता. याविषयी युवानेते सरदेसाई यांना विचारले असता भाजप आमदार यांचे नाव न घेता त्यांना किक मारली आहे. ते म्हणाले, २०१९ साली महाविकास आघाडीच सरकार आलं शिवसेनचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर जी विकासाची गंगा संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसराचे वाहायला लागली आहे.

Shivsena varun sardesai
मनुष्यबळाचे आव्हान तरी मुंबई पोलीस कामगिरीत सरस

त्याचाच एक रिझल्ट म्हणून आपण पाहू शकता अनेक पक्षातील कार्यकर्ते,नगरसेवक पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करतायत आणि आज कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना विचारलं तर त्यांच्या मनात एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि कुठेतरी आपल्याला देखील प्रकाश झोतात राहायला पाहिजे आपल्या देखील बातम्या मीडियाने कव्हर केल्या पाहिजेत त्यामुळे ओढून ताणून शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यान बदल टीका करायची शिवसेनेच्या पालकामंत्र्यावर टीका करायची ही काही लोकांची वृत्ती झालेली आहे आणि टीका केल्याशिवाय त्यांच्या बातम्या छापल्या जात नाहीत हे त्यांना कळून चुकलेल आहे.म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे.

तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. शिंदे यांनी देखील भाजपला किक मारण्याची संधी सोडली नाही. विरोधकांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण आपल्या कामामधून जे बोलतोय ते लोकांर्पयत पोहचतेय. येणाऱ्या काळात विकास कामासाठी आणखी कसा जास्त निधी येईल. यावर माझा जास्त भर असेल. प्रत्येक शहरात फुटबॉलचे स्वतंत्र मैदान असले पाहिजे. जेणेकरून खेळाडूंना चांगला खेळ खेळता येतील. त्यासाठी प्रयत्न केले जातील.

आता माती मैदानावर फुटबॉल खेळला जात आहे. येणाऱ्या काळात टर्फ असेल. कुठे आर्टिर्फिशनल असेल कुठे नॅचरल असेल. जिल्ह्यात फुटबॉल खेळासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे केला जाईल. उद्धव ठाकरे हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आले, तेव्हापासून कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनला मोठा निधी आणण्यात यशस्वी झालो. पूर्ण विभागात विकास कामे सुरु आहेत. रस्ते, फ्लायओव्हरची कामे सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com