smoking at railway premises
smoking at railway premisesSakal media

मुंबई : रेल्वेगाड्यांच्या डब्यांची तपासणी; धूम्रपान करणाऱ्या १६० जणांवर कारवाई

मुंबई : उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे (Drug addicted people) सेवन करणाऱ्यांवरील एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन (central railway authority) आणि सुरक्षा विभागाने संबंधिताचा शोध घेतला. या मोहिमेत दोन दिवसांत १६० जणांवर कारवाई केली. हार्बर मार्गावर पनवेल-सीएसएमटी (Panvel-csmt) उपनगरी गाडीत गुरुवारी (ता. २४) एक प्रवासी गट अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली.

smoking at railway premises
Ukraine-Russia: युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना रॉडनं मारहाण

त्यात काही प्रवासी धूम्रपानास विरोध करीत असतानाही आरोपीने आताच तुरुंगातून जाऊन आलोय. आम्हाला काही फरक पडत नाही, असे त्यातील एक जण बोलत असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या विभागाने ध्वनिचित्रफितीची दखल घेत जवानांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सर्व उपनगरी रेल्वेगाड्यांच्या डब्यांची तपासणी करण्यात आली.

त्यानंतर २४ व २५ फेब्रुवारी असे दोन दिवस धूम्रपानविरोधी सुरक्षा मोहिमेत १६० व्यक्तींवर कारवाई केली. यात मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांचा समावेश आहे. दोषींना २९,७०० रुपयांचा दंड ठोठावला. मुंबई विभागात ६७ प्रकरणातून १३,२०० रुपयांचा दंड वसूल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com