#aarey_forest 'आरे'चा विषय सोडणार नाही; ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

टीम ई-सकाळ
Saturday, 5 October 2019

मुंबई : मुंबईतील आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करणाऱ्या सर्व याचिका काल फेटाळण्यात आल्यानंतर काल (शुक्रवार 4 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून आरेतील झाडांची तोड सुरू करण्यात आली आहे. या वृक्षतोडीविरोधात सत्ताधारी शिवसेनेनेच आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यावर 'आरे'चा विषय अद्याप सोडलेला नाही, असे स्पष्टीकरण देत, उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

मुंबई : मुंबईतील आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करणाऱ्या सर्व याचिका काल फेटाळण्यात आल्यानंतर काल (शुक्रवार 4 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून आरेतील झाडांची तोड सुरू करण्यात आली आहे. या वृक्षतोडीविरोधात सत्ताधारी शिवसेनेनेच आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यावर 'आरे'चा विषय अद्याप सोडलेला नाही, असे स्पष्टीकरण देत, उद्धव ठाकरे (udhav thakre) यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

सोने विक्री संदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शिवसेनेने विशेषतः युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (udhav thakre) यांनी आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे आता प्रत्यक्ष कारशेडसाठी झाडे तोडल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

तेजस्विनी पंडीत सांगतेय मुंबा देवीची व्यथा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आरे येथील मेट्रो कारशेड संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, 'आरे हा विषय सोडलेला नाही आणि कधीच सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांच काय करायचं ते बघू. या संदर्भात सर्व योग्य  माहिती घेऊन योग्यवेळी बोलेन. त्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ.'

चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; पण...

विविध समाजाच्या नेत्यांशी चर्चा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhav thakre) यांनी आज विविध समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यात ओबीसी, आगरी, कुणबी, वंजारी, भटके-विमुक्त, तेली  या समाजातील नेते उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मागण्यांचा पाठपुराव करू नका. तुमच्या मागण्या आता माझ्या मागण्या झाल्या आहे. या मागण्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मंत्रालयावर भगवा फडकवू. बाळसाहेब ठाकरे यांनी जातीपाती विरहीत राजकारण केलं. तेच मी करत आहे. त्यामुळेच हे सगळे समाज आज माझ्यासोबत आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena leader udhav thakre aarey forest statement press conference