Shivsena: डोंबिवलीत प्रभू श्री राम नामाचा जागर; युवासेनेची भव्य बाईल रॅली

उद्या अयोध्येमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी या बाईक रॅलीचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते.
Shivsena bike rally dombivli
Shivsena bike rally dombivli sakal

अयोध्येतील श्री राम मंदिरात सोमवारी प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या सोहळा निमित्ताने डोंबिवली पश्चिमेत शिवसेना युवा सेनेच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. युवा सैनिक या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हाती श्रीरामाचा झेंडा घेत जय श्री राम च्या घोषणा देत यावेळी शिवसैनिकांनी आसमंत दणाणून सोडला.

Shivsena bike rally dombivli
Shivsena Mumbai: मुंबईतील ती शाखा नक्की कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?

अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या सुरेख मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. गल्लोगल्ली जागोजागी प्रभू रामचंद्रांचे झेंडे लावण्यात आले आहेत.

कंदील, दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेला शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या वतीने रविवारी सकाळी डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण भागात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 150 ते 200 बाईकस्वार या रॅलीत सहभागी झाले होते.

Shivsena bike rally dombivli
Shivsena Crisis: Mahapatrakarparishad वरुन Eknath Shinde यांचा शिलेदार थेट Uddhav Thackerayना भिडला

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथून या रॅलीला सुरवात झाली. सम्राट चौक मार्गे मच्छी मार्केट, डोंबिवली रेल्वे स्टेशन, ठाकुर्ली ब्रिज, मंजुनाथ शाळा, घरडा सर्कल, टिळक चौक येथून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा येथे रॅलीची समाप्ती झाली. यावेळी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्यासह शेकडोच्या संख्येने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. युवासेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, उद्या अयोध्येमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी या बाईक रॅलीचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते.

Shivsena bike rally dombivli
Uddhav Thackeray यांचा अखेरचा घाव, Shivsena कोणाची आता दिल्लीत ठरणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com