शिवसेनेच्या 'या' मंत्र्यानं देवेंद्र फडणवीसांना दिला पोलखोल करण्याचा इशारा...

शिवसेनेच्या 'या' मंत्र्यानं देवेंद्र फडणवीसांना दिला पोलखोल करण्याचा इशारा...

मुंबई- महाराष्ट्राची जनता एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यातच राज्यातल्या राजकारणातही अनेक खलबतं सुरु आहेत. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकरानं राज्याला किती पैशांची मदत केली याबाबतची सविस्तर मांडणी केली. त्यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीका केली आहे. फडणवीस तुम्हाला एकट्याला अर्थगणित कळतं असं समजू नका, असा टोला अनिल परब यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, चिरफाड अतिशय सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या जनतेला उद्या सरकारच्यावतीने करुन देऊ, असं म्हणत फडणवीसांवर परब यांनी टीका केली आहे. सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले आहेत. त्यांनी फार मोठं मार्गदर्शन केलं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थ गणित कळतं असा त्यांनी समजू नये. सरकारमध्ये बसलेले बरेच लोक अर्थशास्त्र जाणतात हे त्यांनी लक्षात ठेवावं असे देखील परब म्हणालेत.

सरकार कसं चालवायचं, सरकार कसं चालतं याची जाणीव महाराष्ट्र सरकारला आहे. त्यांनी वेगवेगळे विषय अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की राज्य सरकारला काहीच कळत नाही, जे काय समजतंय ते आम्हाला समजतंय, असंही परब म्हणालेत. फडणवीसांवर टीका करत परब पुढे म्हणालेत की, फडणवीसांनी वेगवेगळे विषय असे मांडले, की महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काही समजतंय ते आम्हालाच समजतंय आणि आमच्या सल्ल्याने सरकार चाललं तरच सरकार चालेल आणि महाराष्ट्राची जनता कोरोनामुक्त होईल. अन्यथा महाराष्ट्र सरकार फार मोठ्या संकटात सापडेल.

मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने, ताकदीने काम करत असल्याचं परब यांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री अहोरात्र काम करून या संकटावर मात करत आहेत. राहिला प्रश्न आज जी फडणवीसांनी आकडेवारी दिली, त्या आकडेवारीची पोलखोल आणि चिरफाड उद्या सोप्या भाषेत महाराष्ट्र सरकार जनतेसमोर मांडणार असल्याचा इशाराही अनिल परब यांनी फडणवीस यांना दिला आहे. लोकांना मूर्ख समजू नका, लोकांना हे कळतंय ही राजकारणाची वेळ नाही. अर्थगणित सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका, असंही परब यांनी म्हटलं आहे.

shivsena minister will take press conference and reply to claims done by devendra fadanavis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com