
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार 5 वर्ष चालेल, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे. सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असं थेट आव्हान राऊतांनी विरोधकांना दिलं आहे.
तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असंही राऊत विरोधकांना म्हणालेत. मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये तशा हालचाली सुरु झाल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचं थेट आव्हानच दिलं.
काय म्हणाले संजय राऊत
काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असं काही तरी सरकार पडणार असल्याचं बोलत असतात. बरं त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाही आहे . त्यांनी जर मुहूर्त काढला असेल तर आमचीही गटारी आहेच की. आम्ही कोकणातील लोक आहोत, गटारी कशी असते दाखवून देऊ. हे महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही, असं थेट टोला राऊतांनी भाजपला लगावला. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले की, तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स महाराष्ट्रात चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षे तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल, असंही ते म्हणालेत.
हेही वाचाः आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा
पुढे विरोधकांना इशारा देत राऊत म्हणाले, रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार? असं राऊत म्हणाले.
shivsena mp sanjay raut challange opposition party bjp
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.