महानायकाच्या आरोग्यासाठी चाहत्यांकडून देशभरातून प्रार्थना...

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क
रविवार, 12 जुलै 2020

मिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनी पूजाअर्चा सुरू केली आहे

मुंबई ः अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनी पूजाअर्चा सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे  तसेच कांदिवलीतील एका हनुमान मंदिरात होमहवन सुरू केले आहे. अन्य काही ठिकाणी त्यांचे चाहते अमिताभ बच्चन लवकरात लवकर घरी यावेत याकरिता प्रार्थना करीत आहेत. नानावटी रुग्णालयाबाहेर मीडियाची प्रचंड गर्दी आहे. पोलिसांनी बॅरिगेट््स टाकले आहेत.

Breaking - अभिनेते अनुपम खेर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही तब्येत स्थिर आहे. अमिताभचा जुहू जलसा आणि झनक हे दोन्ही बंगले कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसा बंगला सील केला आहे तसेच तेथील सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली आहे. अमिताभला कोरोना झाल्याची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी अमिताभ लवकर आपल्या घरी परत यावेत याकरिता पूजाअर्चा करीत आहेत.. अशीच पूजाअर्चा व होमहवन अमिताभ यांच्या चाहत्यांनी १९८२ मध्ये कुली या चित्रपटाच्या सेटवर श्री. बच्चन यांना दुखापत झाली असताना केली होती. आताही त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.

'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ...

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच केलेली कविता गुजर जायेगा...गुजर जायेगा...ही व्हायरल होत आहे. कोरोनाच्या कालावधीत सगळ्यांच्या हौसला वाढविण्यासाठी तसेच सकारात्मक संदेश देण्यासाठी त्यांनी ही कविता केली होती. 

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prayers from fans across the country for the health of the hero