संजय राऊत म्हणतात, 'बन्दे है हम उसके....'

Shivsena MP Sanjay Raut tweets on 15 November
Shivsena MP Sanjay Raut tweets on 15 November

मुंबई : दररोज न चुकता सकाळी सकाळी ज्यांचे सूचक ट्विट पोस्ट होते असे नेते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. रोज ते सकाळी सकाळी एखाद्या कवितेतील चार ओळी ट्विट करतात. त्यातून सूचक वक्तव्य त्यांना करयाचे असते. आजही त्यांनी अशाच प्रकारे चार ओळी पोस्ट केल्या आहेत.

संजय राऊत यांनी आज ट्विट करताना म्हणलं आहे की, 'बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर'. हे गाणे 'धूम 3' या चित्रपटातले असून आदित्य चोप्रांनी लिहिले आहे. या ट्विटवरून अजूनही त्यांना सत्तास्थापनेबाबत सकारात्मकता आहे, असे लक्षात येते. एका पत्रकार परिषदेत त्यांना या दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

लिलावतीमधूनही ट्विट
11 नोव्हेंबरला राऊतांची अँजिओप्लास्टी झाली. तरीही त्यांनी लिलावती रूग्णालयतून ट्विट केले होते. तसेच दुसऱ्या दिवशी त्यांनी रूग्णालयातूनच अग्रलेख लिहिला होता. त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शरद पवारांपासून ते भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्व नेत्यांनी रूगणालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. 

सत्तासंघर्षांत कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. शिवसेना व संजय राऊतांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मुदतीच्या आत सत्तास्थापन करण्यास ते अपयशी ठरले. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे या सत्तासंघर्षात सत्तासमीकरण बदलणार का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com