रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कोठडीत वाढ; ११ संशयितांच्या जामीनावर २५ नोव्हेंबरला निर्णय

Palghar Relief Hospital Case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ११ संशयितांच्या जामीन अर्जांवर २५ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.
Palghar Relief Hospital Case

Palghar Relief Hospital Case

ESakal

Updated on: 

पालघर : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोंडी आणखीन वाढली आहे. अकरा संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर गुरुवारी (ता. १९) निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र सरकारी पक्षाकडून दोषारोप निश्चित करण्यासंदर्भातील अर्ज आणि आमदारपुत्र रोहित गावीत यांना प्रकरणातून वगळण्याबाबत त्यांच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयात दाखल झाल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता २५ नोव्हेंबर रोजी जामीन अर्जावर निर्णय होणार असल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांना आणखी सहा दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

Loading content, please wait...