संभाजीराजेंवर शिवसेनेचा दबाव? राजे तातडीने मुंबईला रवाना

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातल्या शिवसेना शहराध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSakal

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने उमेदवारीसाठी पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर अप्रत्यक्षरित्या आता शिवसेनेने कोल्हापुरातले शिवसेनेचे प्रमुख संजय पवार यांच्या नावाचा विचार सुरू केलाय. त्यामुळे संभाजीराजेंवर दबाव तयार होत असल्याचं चित्र आहे. (Sambhajiraje Chhatrapati)

Sambhajiraje Chhatrapati
शिवसेनेची ऑफर धुडकावली, संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना

संभाजीराजेंनी उमेदवारी फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांनाच उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे काही वेळातच आता संभाजीराजेंना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. संभाजीराजे सध्या कोल्हापुरात आहेत. पण ते लवकरच मुंबईला रवाना होणार आहेत. शिवसेनेच्या ऑफरकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली होती. पण आता कोल्हापुरातल्या शिवसेना नेत्याचा विचार केला जात असल्याने संभाजीराजेंनी लवकर निर्णय घेणं भाग आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर आपलाच उमेदवार जाईल, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. यासाठी शिवसेनेने काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचाही विचार सुरू केला आहे. यामध्ये चंद्रकांत खैरे यांचंही नाव आघाडीवर आहे, तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचाही विचार सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com