
मुंबई : शिवसेना शिंदे पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभानिहाय प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे मुंबई आणि उपनगरांतील निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. मुंबई महापालिकेची नुकतीच प्रभागरचनेची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याला आता अंतिम स्वरूप दिले जाईल.