

BJP and Shivsena Shinde group dispute in Kalyan
ESakal
डोंबिवली : पक्ष प्रवेशावरून निर्माण झालेला वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एकत्रित उपस्थितीनंतर थंड झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे इच्छुक उमेदवार पुन्हा आमनेसामने आले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महायुती मधील भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.