
MNS-Thackeray groups Protest
ESakal
ठाणे : वाढती वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचऱ्याची समस्या आणि बोकाळलेला भ्रष्टाचार आदी मुद्दे घेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे रस्त्यावर उतरले आहेत. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंची सेना मोर्चा काढणार आहे. या मोर्चाची तयारी झाली असून त्याला अतिविराट स्वरूप देत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीआधी विरोधकांनी आपली वज्रमूठ घट्ट करण्यास सुरुवात केल्यामुळे हा मोर्चा त्याची दिशा देणारा ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.