
Shivsena Dasara Melava
ESakal
मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेना पक्ष जोरदार शक्तीप्रर्शन करण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाला आझाद मैदानावर तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मेळाव्यात रेकॉर्डब्रेक गर्दी जमविण्यासाठी झटत आहेत. या मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओल्या दुष्काळाच्या भीषणतेने दोन्ही दसरा मेळावे गाजणार आहेत.