Water Scarcity
ठाणे : ठाण्यातील बेडेकरनगर मधील अनेक नागरिकांना ऐन नवरात्री उत्सवात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली व ठाकरे गटाचे शिवसेना विभागप्रमुख संजय जाधव यांच्या पुढाकाराने बेडेकर नगर येथील पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत, थेट दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि दिलेल्या निवेदनात ठाकरेंच्या शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.