

Congress and Thackeray group Leader Join Shinde Shivsena
ESakal
वाशी : नवी मुंबईत राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी, तसेच नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.