esakal | उल्हासनगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे यांचे निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे यांचे निधन...

दरम्यान, त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागल्याने सुर्वे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मावळली.

उल्हासनगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे यांचे निधन...

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : कोरोनावर मात करून स्वगृही परतलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे (वय 54) यांचे आज सायंकाळी निधन झाले. नेमक्या मैत्रीदिनाच्या दिवशीच सुर्वे यांच्यावर काळाने झडप घातल्याने उल्हासनगरकरांनी चांगला आणि कार्यसम्राट मित्राला गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

मिठीबाईच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार...

सुनील सुर्वे हे उल्हास स्टेशन मराठा परिसरातून महापौर लिलाबाई आशान, नगरसेवक शेखर यादव,नगरसेविका मिताली चानपूर यांच्यासोबत निवडून आले होते. गेल्या महिन्यात सुनील सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मातही केली केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी सातत्याने कमी जास्त होत होती. त्यामुळे ते सदैव ऑक्सिजनची लहान बॉटल सोबत बाळगत होते. तसेच त्यांना किडनीचा आणि काही वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. 

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

दरम्यान, त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागल्याने सुर्वे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मावळली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, महापौर लिलाबाई आशान, सभागृहनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, धनंजय बोडारे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शोक व्यक्त केला.
--
संपादन ः ऋषिराज तायडे