

Knife Attack in Moving Local Triggers Chaos Near Vashi Station
Sakal
Mumbai Local Train Attack : जुन्या वादातून पेटलेल्या मानखुर्द येथील व्यक्तीने रागाच्या भरात लोकल ट्रेनमध्ये तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २३) सकाळी वाशी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर हल्लेखोर तरुण पळून गेला असून वाशी रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.