धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेची गळफास घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कांदिवली येथे राज्य कामगार विमा रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा दिवसांपुर्वीच ही महिला कोरोनाबाधित आढळल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते.

गोरेगाव (मुंबई) : कांदिवली येथे राज्य कामगार विमा रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा दिवसांपुर्वीच ही महिला कोरोनाबाधित आढळल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील जिन्याच्या पायऱ्यांमधील जागेत या 64 वर्षीय महिलेने फाशी घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही बातमी वाचली का? मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींची गैरसोय; अफगाणच्या चार विद्यार्थिनी 
 
महिला परळ येथील भोईवाड्याची रहिवासी आहे. कोरोनाबाधित आढळल्याने महिलेला 12 मे रोजी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र 16 मे रोजी महिलेने साडीने गळफास घेतला. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

ही बातमी वाचली का? दबंग सलमानच्या नावाने कास्टिंग फसवणूक, अभिनेत्याची पोलिसांकडे तक्रार

याबाबत महिलेच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती घेत असल्याचे पालिकेच्या आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले; तर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून पुढील चौकशी करत असल्याचे समता नगर पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking! Corona-infected woman pass away by strangulation in kandivali