धक्कादायक! शेजारच्या महिलेकडून 4 वर्षांच्या मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

आरोपी आणि पीडित मुलाचं कुटुंब एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्यामध्ये अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन भांडण झाले होते.

मुंबई : एका महिलेनं शेजाऱ्याच्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीत घडलेल्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. जुन्या वादातून 39 वर्षीय महिलेनं तिच्या शेजाऱ्याच्या चार वर्षाच्या मुलाचा हत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपी महिला मधु गधे हिला अटक केली आहे. सोमवारी रात्री उशिरा आरोपी महिलेनं अंधेरी येथील संतोषी माता नगरमधील आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिनं लेगिंगनं त्या मुलाचा गळा आवळला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यात मुलाचा मृत्यू झाला आणि तिनं त्यानंतर त्याचा मृतदेह बाथरुममध्ये पाण्यानं भरलेल्या बादलीत टाकला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

काही वेळानंतर मुलगा सापडत नसल्याचं बघून त्याच्या आईनं परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्याच्या आईनं आजूबाजू असलेल्या शेजाऱ्याच्या घरात शोधाशोध केली. पण तो सापडला नाही. त्यानंतर मृत मुलाच्या आईनं आरोपी महिलेच्या घरी गेली. मात्र आरोपी महिलेनं मुलाच्या आईला घरात येण्यास नकार दिला. पण तरीही मुलाची आई आणि काही शेजाऱ्यांनी तिच्या घरात प्रवेश केला. मग त्यानंतर चित्र भयानक होतं. मुलाचा मृतदेह आरोपी महिलेच्या बाथरुममध्ये आढळून आला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

महत्वाची बातमी : ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

आरोपी महिला गधे हिला मंगळवारी अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली. आरोपी आणि पीडित मुलाचं कुटुंब एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्यामध्ये अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन भांडण झाले होते, असंही त्यांनी सांगितलं.

Shocking death of a 4 year old boy in mumbai read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking death of a 4 year old boy in mumbai read full story