अंबरनाथची दुकाने आणि रिक्षा आजपासून तीन दिवस बंद...

अंबरनाथची दुकाने आणि रिक्षा आजपासून तीन दिवस बंद...

अंबरनाथ - देशभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा अंबरनाथमध्ये संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. आज शुक्रवारपासून अंबरनाथची  दुकाने आणि रिक्षा व्यवसाय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या  बंदमधून अत्यावश्यक दुकाने वगळण्यात आली आहेत. 

कोरोनाचा संसर्ग शहरात पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवार (१९) रोजी नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार,  यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी आणि रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांची  बैठक झाली. सहाय्यक पोलीस उपयुक्त विनायक नरळे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा, धुमाळ, सुनील जाधव ,  व्यापारी आणि रिक्षाचालक मालक संघटनेचे रामदास पाटील, निवृत्ती कुचिक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल आणि व्यापारी  उपस्थित होते. 

कोरोनाचा प्रभाव  महाराष्ट्रासह मुंबईमध्ये झाला आहे, अंबरनाथमध्ये त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांची गर्दी टाळणं गरजेचे आहे, यासाठी  दुकाने आणि रिक्षा व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले. यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. करोनाबाबत नगरपालिकेने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. 

कोरोनाच्या वाढत्या व्याप्तीबाबत शहरप्रमुख वाळेकर,सहाय्यक  पोलीस उपायुक्त नरळे यांनी माहिती विशद केली. आणि व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आजारी, वृद्ध नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर पाच रिक्षा उपलब्ध कराव्यात म्हणजे त्यांची गैरसोय होणार नाही असे आवाहन शहरप्रमुख वाळेकर यांनी केले. 

गरज असेल तर घराबाहेर पडा  

कोरोनाच्या प्रादुर्भावाला शहरात शिरकाव टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे, गरज असेल तर नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन नगराध्यक्षा वाळेकर यांनी केले. 

shops and auto rikshaw will remain close for next three days due to corona 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com